अमरावती,
adya-brahmavadini-foundation : आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनद्वारे आयोजित तसेच फाऊंडेशनच्या संस्थापक डॉ. वृषाली शिलेदार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल तराळ यांच्याद्वारे दिग्दर्शित राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित नाटिकेचे यशस्वी सादरीकरण शनिवार ६ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडले.

नाटिकेचे उत्कृष्ट संवाद लेखन डॉ. छाया नाईक यांनी केले आहे. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू आणि राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत संपर्क प्रमुख माया भारतीय, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह आद्य ब्रह्मवादिनीच्या संस्थापिका डॉ. वृषाली शिलेदार व अमरावती ब्रह्मवादिनीच्या पालक अंजली देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी स्वरश्री संगीत अॅकेडमीच्या संचालिका कविता गुर्जर व संचाने सरस्वती स्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींसह गौरी लवाटे यांचा सत्कार वृषाली शिलेदार व संघटिका वर्षा वैजापूरकर, अंजली देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. रसिका वैष्णव, संजीवनी पुरोहित या कलावंतांसह निवेदक अमृता वडवेकर, स्वाती तराळ यांनाही गौरविण्यात आले. बालकलाकार स्वेहा तराळ, संस्कार नागपूरकर यांचा गौरव करण्यात आला.
ब्रह्मवादिनी अमरावतीच्या संघटिका दीपाली काळे, वर्षा वैजापूरकर, कार्यक्रमाच्या संयोजिका रेवती देशपांडे व समस्त कार्यकारिणी सदस्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. संचलन माधुरी दाणी यांनी तर आभार प्रदर्शन ऊमा राजनेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी ब्रह्मवादिनी सखी मंचच्या संघटिका दीपाली काळे, वर्षा वैजापूरकर, तसेच कार्यकारिणी सदस्य रेवती देशपांडे, कविता गुर्जर, अश्विनी मठे, सविता देशमुख, संगीता नागपूरकर, पल्लवी जोशी, कल्याणी पाठक, स्नेहल मराठे, प्रियंका महाजन, दीपाली जोशी, रोहिणी केदार, रोहिणी राजनेकर, सोनाली चाटी यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे दमदार दिग्दर्शन विशाल तराळ यांनी केले. तरूणपणातील मावशी केळकरांच्या भूमिकेतील रसिका वैष्णव भाव खाऊन गेली. वार्धक्यातील मावशींची भूमिका साकारणार्या संजीवनी पुरोहित यांचा अभिनय दर्जेदार होता. त्याचप्रमाणे बाल लक्ष्मीबाई, हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, म. गांधी यांच्यासह इतर सर्वच कलावंतांनी भूमिका उत्कृष्टपणे पार पाडल्या. नेपथ्य देखिल उत्कृष्ट होते.