दुर्मिळ हरणटोळ साप आढळला; सर्पमैत्रीणने पकडले

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नांदगाव पेठ, 
harantol-snake : येथील बाळापुरे लेआऊट परिसरात रविवारी अचानक एक दुर्मिळ हिरवा साप दिसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नागरिकांनी तत्परतेने सर्पमैत्रीण संघटना पाटील यांच्याशी संपर्क साधला. संघटना पाटील यांनी सापाला पकडल्यानंतर तो हरणटोळ असल्याचे निश्चित केले. दुर्मिळ असणारा हरणटोळ हा साप निमविषारी असून माणसासाठी पूर्णपणे निरुपद्रवी आहे. मात्र उंदीर, बेडूक, सरडे अशा छोट्या प्राण्यांवर तो आपले भक्ष्य मिळवण्यासाठी विषाचा वापर करतो.
 
 
SANKE
 
वाढती वृक्षतोड, रस्त्यावरचे विकासकाम, शेतीतील रासायनिक औषधे यांमुळे या प्रजातीचे नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. त्यामुळे हरणटोळासह अनेक साप प्रजाती दुर्मिळ होत चालल्या आहेत. लोकांच्या अंधश्रद्धांमुळेही या सापांवर अनावश्यक हल्ले होत असल्याने त्यांची संख्या घटत आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने हरणटोळ हा अत्यंत महत्त्वाचा साप आहे. परिसरातील उंदीर व सरपटणार्‍या प्राण्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यात तो मोठी भूमिका बजावतो. पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी अशा प्रजातींचे अस्तित्व अत्यावश्यक आहे. बाळापुरे लेआउटमध्ये आढळलेल्या या सापाला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे पकडून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या कार्यात सर्पमैत्रीण संघटना पाटील, ठकसेन इंगोले, रूपेश खंडारे, शुभम विघे व अभिजित दाणी यांनी मोलाचे सहकार्य केले.