स्पर्धेत २० गावं अन् ८०० खेळाडू

*एवोनिथमध्ये स्पोर्ट डे चे उद्घाटन

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
avonith-sport-day : वर्धा शहराला लागून असलेल्या पूर्वाश्रमीच्या लॉयड् आणि आताच्या एवोनिथ स्टील प्लॉन्ट येथे आज ९ रोजी स्पोर्ट डे उद्घाटन मोठ्या थाटात झाले. येथे आयोजित स्पर्धांमध्ये आजूबाजूच्या २० गावांतील ८०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. भव्य अशा मैदानावर जिकडेतिकडे खेळाडूच दिसत होते.
 

JKL 
 
एओनिथच्या वतीन सामाजिक दायित्वातून परिसरात वर्षही भर विविध सामाजिक आरोग्य विषय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी भूगाव परिसरातील ज्या गावांमध्ये सामाजिक दायित्वातून कार्यक्रम केले जातात त्या सेलूकाटे, इंझापूर, चितोडा, बरबडी, भुगाव, जामठा, कुरझडी, जऊळगाव,आष्टा, मांडवगड, मिरापूर, नेरी, धानोरा, नांदोरा, भीवापूर, भोजनखेडा, निमसडा, बोरगाव आणि सरूळ येथील जवळपास ८०० युवक- युवतींनी क्रीकेट, कबड्डी, खो-खो या खेळांमध्ये सहभाग घेतला.
 
 
या दोन दिवसीय खेळ स्पर्धेचे उद्घाटन आज ९ रोजी सकाळी ११.३० वाजता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जय सराफ यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिल बांगुर, रत्ना प्रसाद, आर. के. शर्मा, पी. के. पटनायक, मनीष भावा, कोनिया सीलविरा, सोनाली सराफ यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विवेक श्रौती, प्रशांत जवदंड, आदींसह कंपनीतील पदाधिकारी उपस्थित होते. तीनही खेळांमध्ये जिंकलेल्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. उद्या बुधवार १० रोजी सायंकाळी या स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल, असे प्रशांत जवदंड यांनी सांगितले.
 
 
उद्घाटनप्रसंगी संचालक जय सराफ म्हणाले की, आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही सामाजिक दायित्वातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतो. यावेळी स्पोर्ट डेच्या माध्यमातून परिसरातील २० गावांतील खेळाडू आमच्या कंपनीच्या मैदानावर एकत्र आले आहेत. व्यतीच्या आयुष्यात खेळाला फार महत्त्व आहे. खेळातून व्यती मोठा होतो. येथे खेळणार्‍यांपैकी खेळाडूंनी जिल्हा आणि राज्यस्तरावर आपली कामगिरी दाखवावी, अशी अपेक्षा व्यत करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.