‘धुरंधर’ चित्रपटावर थेट बलूचिस्तानच्या नेत्याची टीका

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Balochistan leader criticizes 'Dhurandhar' सध्या चर्चेत असलेला ‘धुरंधर’ चित्रपट बलूचिस्तानातूनही चर्चेचा विषय बनला आहे. अक्षय खन्ना यांनी बलूच गँगस्टर रेहमानच्या भूमिकेत साकारलेला हा चित्रपट सोशल मीडियावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. तीन तास तीस मिनिटांचा हा मल्टीस्टारर चित्रपट रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिकांसह प्रदर्शित झाला आहे. चित्रपटावर बलूचिस्तानातून थेट प्रतिक्रिया आली असून, बलूच नेता मीर यार बलोच यांनी ‘धुरंधर’ चित्रपटावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, भारत-बलूचिस्तान संबंध चुकीच्या स्वरूपात दाखवले गेले आहेत. बलूच स्वातंत्र्य चळवळ, बलूच संस्कृती आणि परंपरेवर चित्रपटात खूप कमी संशोधन केले गेले असल्याचे ते म्हणतात. मीर यार बलोच यांच्या मते, चित्रपटाने बलूचिस्तानचे गँगस्टर्सवर जास्त लक्ष केंद्रित केले असून देशभक्त बलूचांचा पुरेसा समावेश केला नाही.
 
 

Dhurandhar 
 
चित्रपटाची कथा 1999 च्या कंधार विमान हायजॅक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू होते, त्यानंतर 2001 च्या संसदेवरील हल्ल्याशी जोडली गेली आहे. कथेत भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख अजय सान्याल पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क मोडून काढण्यासाठी मोहीम आखताना दिसतात. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना अल्लाहू अकबरच्या घोषणा करताना दिसतात, ज्यावर मीर यार बलोच यांनी टीका केली.
 
 
 
ते म्हणतात, “बलोच लोक कधीच भारताच्या विरोधात ISI सोबत हातमिळवणी करत नाहीत. गँगस्ट बलूचिस्तानचे प्रतिनिधीत्व करत नाहीत. बलूच लोक स्वातंत्र्यासाठी लढत आहेत आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचे कधीच स्वागत केलेले नाही.” तसेच, मीर यार बलोच यांनी सांगितले की, “बलूच स्वातंत्र्य सैनिकांकडे नेहमीच शस्त्रांची कमतरता होती, अन्यथा ते पाकिस्तानी अतिक्रमणकारकांना आधीच पराभूत करीत असते. बलूच गँगस्टर्सकडे जर बनावट नोटा छापण्याइतके पैसे असते, तर बलूचिस्तानात गरीबी नसती. ड्रग्स तस्करी, फेक करन्सी आणि शस्त्रास्त्र यासारखी घातक कामे ISI करते.” बलूच नेता मीर यार बलोच यांच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट होते की, बलूचिस्तानचे लोक भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात आणि त्यांच्या देशभक्तीला ‘धुरंधर’ चित्रपटात योग्य न्याय मिळालेला नाही, असा त्यांचा आरोप आहे.