अमरावती भाजपाचे इच्छूकांसाठी अर्ज वितरण

-१३ व १४ डिसेंबरला मुलाखती -महापालिका निवडणूक तयारी

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
applications-for-aspirants : येत्या नववर्षात म्हणजेच जवळपास जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगातर्फे अमरावती महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरावती शहर भाजपा तयारीला लागली आहे. आतापर्यंत बूथ बांधणी तथा प्रभाग निहाय विविध कार्यक्रम केल्यानंतर आता पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता अर्ज वितरण व प्रत्यक्ष मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
 
 
 
BJP
 
 
स्थानिक लक्ष्मण स्मृती, भाजपा कार्यालय राजापेठ अमरावती येथे १०, ११, १२ डिसेंबर रोजी सर्व प्रभागांच्या इच्छुक उमेदवारांसाठी तिन्ही दिवस सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे फॉर्म उपलब्ध असणार आहेत. हा अर्जासाठी सर्वसाधारण गटाकरिता १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून राखीव म्हणजे अनु.जाती व अनु. जमाती व ना.मा.प्र. गटाकरिता तसेच महिला आरक्षण गटातील इच्छुक उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क आकारल्या जाणार आहे.
 
 
भरलेल्या अर्जासह १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ११ च्या इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार आहे. १४ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ११ ते प्रभाग क्रमांक २२ या प्रभातील इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखत सकाळी १० वाजेपासून घेतल्या जाणार आहे.
 
 
याबाबत अधिक माहिती देत भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढण्याची आपली स्वतःची एक पद्धती आहे. निवडणूक लोकसभेची असो की स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रत्यकच निवडणूक तेवढीच महत्वपूर्ण आहे. संपूर्ण शक्तीने ही निवडणूक लढून विजयश्री प्राप्त करण्याच्या अनुषंगाने नियोजन आखले जात आहे. भाजपामध्ये सामूहिक निर्णय पद्धती आहे. त्यामुळे सुरुवातीला अमरावती मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागामध्ये पक्षातर्फे निरीक्षक पाठवल्या गेले. यावेळी भाजपच्या तळागाळात काम करणार्‍या अगदी बूथ प्रमुखापासून ते प्रदेश पदाधिकार्‍यांपर्यंत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. आता प्रत्यक्ष मुलाखतद्वारे सुधा उमेदवार निवडण्यासाठी पक्षाने ही योजना आखलेली आहे. येत्या अमरावती मनपा निवडणुकीत भाजपातर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून प्रक्रियेला पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले.