भाजप उमेदवारी अर्जासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी

bjp-nagpur-nmc एक हजाराहून अधिक इच्छूकांनी नेले अर्ज

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
 
 
bjp-nagpur-nmc महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असताना नागपूर महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीने इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप मंगळवारी सुरू केले. पहिल्याच दिवशी भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती. एक हजाराहून अधिक इच्छूकांनी उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली. 
 
 
bjp-nagpur-nmc
  (भाजपा कार्यालयात इच्छूक उमेदवारांची गर्दी )
 
 
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबरbjp-nagpur-nmc

महानगरपालिका निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप दुपारी २.३० वाजता सुरुवात करण्यात आले. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती. bjp-nagpur-nmc यात महिलांची सर्वाधिक संख्या होती. मोठी गर्दी लक्षात घेवून अर्ज वाटप टेबलांची संख्या वाढवावी लागली. महिलांसाठी वेगळे टेबल लावण्यात आले होते. भाजप दयाशंकर यांनी प्रथम अर्ज श्रीकांत आगलावे यांना प्रदान करून अर्ज वाटपाचा शुभारंभ केला. महानगरपालिकेत ३८ प्रभाग असून १५१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. गणेशपेठ येथील श्रद्धा मंगलमच्या भाजप महानगर कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारल्या जाणार आहे.
 
 
 
bjp-nagpur-nmc महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी अर्ज शुल्क एक हजार तर इतर प्रवर्गांसाठी २ हजार असून बुधवार, १० डिसेंबर रोजी अर्ज वाटप आणि स्वीकारणे सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख गुरुवार,११ डिसेंबर असून संपूर्ण प्रकिया कार्यालय मंत्री ब्रिजभूषण शुक्ला, अशोक नायक यांच्या नेतृत्वात पार पडणार आहे. अर्ज वाटप शुभारंभ प्रसंगी श्रीकांत गावंडे, संदीप जाधव, विष्णू चांगदे, बाल्या बोरकर,रामभाऊ आंबुलकर, रमेश शिंगारे, राऊत, सुधीर हिरडे, भूषण गावंडे,कमलेश चकोले आदी उपस्थित होते.