बीसीसीआयच्या नाकाखाली मोठा क्रिकेट घोटाळा!

पैशांच्या जोरावर संघात प्रवेश

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
पुडुचेरी,
Cricket scam under BCCI पुडुचेरीत बीसीसीआयच्या नाकाखाली मोठा क्रिकेट घोटाळा उघडकीस आला असून, खेळाडू संघात प्रवेश मिळवण्यासाठी सरळ शॉर्टकटचा वापर केला जात आहे. इथे खरे टॅलेंट बाजूला ठेवले जात असून, फक्त पैशाच्या जोरावर लोकांना स्थान मिळत आहे. मोठ्या रकमेत बनावट घराचे पत्ते तयार केले जातात, खोटे एलिजिबिलिटी सर्टिफिकेट दिले जातात आणि हे सर्व बीसीसीआयला न कळता चालते.
 
 
Cricket scam under BCCI
 
एका वृत्तानुसार, मागील तीन महिन्यांत पुदुचेरीतील २००० हून अधिक खेळाडूंच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची तपासणी केली. अनेक माजी व सध्याचे खेळाडू, अधिकारी आणि प्रशिक्षकांशी संवाद साधण्यात आला, तसेच दिलेल्या राहत्या पत्त्यांची आणि शिक्षण संस्थांची प्रत्यक्ष चौकशीही करण्यात आली. तपासणीत उघडकीस आले की खाजगी क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षकांकडून चालवली जाणारी सुव्यवस्थित बेकायदेशीर व्यवस्था होती. ते बनावट कागदपत्रे पुरवतात आणि इतर राज्यातील खेळाडूंना बीसीसीआयच्या अनिवार्य एक वर्षाच्या निवासस्थानाच्या आवश्यकता पूर्ण करून स्थानिक खेळाडू म्हणून दाखवतात. या सुविधेसाठी १.२ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेतली जाते.
 
 
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वेगवेगळ्या संघांतून खेळणारे १७ “स्थानिक” खेळाडू एकाच आधार कार्डावरील पत्ता वापरत होते. घरमालकाने चौकशी केली असता, हे सर्व भाडे न भरल्यामुळे महिन्यांपूर्वीच घराबाहेर काढले गेले होते. या फसवणुकीमुळे पुडुचेरीत जन्माने स्थानिक खेळाडूंची संधी हिसकावली जात आहे. गेल्या चार वर्षांत पुडुचेरीने २९ रणजी सामने खेळले, त्यात फक्त चार खेळाडू जन्माने पुदुचेरीचे होते. यावर्षी वीनू मांकड ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ११ पैकी ९ खेळाडू बाहेरील राज्यांचे होते आणि त्यांना स्थानिक खेळाडू म्हणून मैदानात उतरवण्यात आले. या प्रकरणामुळे पुडुचेरी क्रिकेटमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि बीसीसीआयच्या नियंत्रणातील गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत.