विधिमंडळात बालसुधारगृहातील सुरक्षा आणि डॉक्टर आत्महत्येचे प्रकरण गाजले

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Doctor's suicide rumours in the legislature नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिला व बालसुधारगृहातील सुरक्षा व व्यवस्थापनाविषयी प्रश्न उपस्थित झाला. आमदार चित्रा वाघ यांनी उल्हासनगर (ठाणे) येथील शांतीसदन महिला वसतिगृहातून सहा महिला व पनवेल (रायगड) येथील बालगृहातून पाच मुलींचे पलायन झाल्याची माहिती दिली. त्यांनी विचारले की, या संदर्भात सुरक्षा आणि व्यवस्थापनातील त्रुटींसाठी कोणती कारवाई करण्यात आली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले की, राज्यातील महिला व बालसुधारगृहांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे १००% सुरक्षा रक्षकांची पदे भरण्यात आली असून सर्व रिक्त पदे महिनाभरात भरली जाणार आहेत.
 
 
Doctor
 
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. तपासात उघडकीस आले आहे की, संबंधित पोलिस अधिकाऱ्याने शारीरिक शोषण आणि फसवणूक केली होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या घटनेची न्यायालयीन चौकशी सुरू असून राजकारण करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. मुख्यमंत्री यांनी विशेष उल्लेख केला की, नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सुरक्षा आवश्यक आहे, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यानुसार अधिक कडक शिक्षा होणार आहे आणि या आत्महत्येच्या घटनेतील कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत केली जाईल.
५१ वा संसदीय अभ्यास वर्ग आयोजित
राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ५१ वा संसदीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आजपासून १३ डिसेंबर २०२५ पर्यंत विधान भवनात चालणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्राध्यापक राम शिंदे, नीलम गोऱ्हे, आशिष शेलार यांची उपस्थिती असून, मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण शिकतो आणि प्रत्यक्षात अनुभवतो यामध्ये फरक लक्षात येतो. इतक्या जवळून लोकशाहीच्या सर्व प्रक्रिया पाहता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी या उपक्रमातून अनेक विद्यार्थी लाभान्वित होतात.