लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल!

फडणवीस अभिमन्यू पवारांवर चिडले

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Fadnavis gets angry with Abhimanyu Pawar महाराष्ट्र विधानसभा मंगळवारी लाडकी बहीण योजनेच्या चर्चेत गोंधळलेली दिसली. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही या योजनेचा सतत उल्लेख होत असल्यामुळे सभागृहात चर्चेचा वेग वाढला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात काहीसे चिडल्याचे दिसले. त्यांनी त्यांच्या पूर्व सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे कान टोचत म्हणाले, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल.
 
 
 
Fadnavis with Abhimanyu Pawar
अभिमन्यू पवार यांनी आपल्या भागातील अवैध दारुविक्रीचा मुद्दा सभागृहात मांडला आणि लाडक्या बहिणींच्या समस्यांशी संबंधित असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, महिला बहिणी अवैध दारुविक्रीबाबत विचारणा करतात आणि त्यावर सुधारणा आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, विधानसभा अध्यक्षांनी याबाबत बैठक घेऊन गृह विभाग आणि अन्न औषध प्रशासनाला निर्देश दिले होते, तरीही कारवाई झाली नाही.
 
 
यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक विषयाचा संबंध सतत लाडकी बहीण योजनेशी जोडण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींचे पैसे सुरू राहतील, योजना बंद होणार नाही. दुसऱ्या योजनेशी तुलना करता येत नाही. अध्यक्षांनी निर्देश दिले असतील आणि अंमलबजावणी झाली नसेल, तर ती तातडीने केली जाईल.