अंतिम मतदार यादी व जाहीर आकड्यांमध्ये तफावत

*अखिल धाबर्डे यांचा आरोप

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट, 
akhil-dhabarde : हिंगणघाट नगर परिषदने निवडणुकीपूर्वी अंतिम मतदार यादी ३१ ऑटोबर रोजी प्रसिद्ध केली होती. यामध्ये प्रभाग ६ चे मतदार ४ हजार ३८२ होते तर २ डिसेंबर रोजी मतदान झाल्यावर प्रशासनाने जी यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये ४ हजार ४०० मतदार दाखवले आहेत, असा आरोप एकता प्रतिष्ठानचे प्रमुख अखिल धाबर्डे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
KL;P
 
मतदार याद्यांचा घोळ संपता संपेना. या घोळाचा देशभर संताप व्यत केला जात असताना हिंगणघाट येथील प्रभाग ६ मध्ये असाच प्रकार पुढे आला आहे. निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्या यादीत ४ हजार ३८२ मतदारांची नोंद होती. मात्र, मतदानानंतर प्रशासनातर्फे जाहीर केलेल्या यादीत तफावत आढळून आला असून १८ मतदार अधिक दाखवण्यात आले आहे. या घोळामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, एकता प्रतिष्ठानचे प्रमुख अखिल धाबर्डे यांनी उपविभागीय अधिकार्‍यांची भेट घेऊन या मतदार यादीतील घोळासंबंधी माहिती देत निवडणूक अधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश देऊन समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली.
 
 
नगरपरिषद प्रशासनातर्फे जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आकडे सारखे आहेत. पण, निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर ही चुक कायम आहे. ही बाब गंभीर असून यात सुधार करण्यात यावा यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी ई-मेल व्दारे त्यांना विनंती करू, अशी ग्वाही उपविभागीय अधिकार्‍यांनी अखिल धाबर्डे यांना दिली. निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी असून त्याआधी हिंगणघाटमधील उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील आकडेवारी तपासून घ्यावी व काही तफावत आढळल्यास त्वरित प्रशासनाकडे तक्रार करावी, अशी विनंतीही धाबर्डे यांनी केली आहे.
 
 
आणि गुंता सुटला
 
 
या तक्रारीची निवडणूक अधिकार्‍यांनी शहानिशा केली असता या प्रभागातील मतदान केंद्र २ मधील मतदार ८६९ ऐवजी ८८७ नगरपरिषद निवडणुकीची अंतीम आकडेवारीची निवडणूक आयोगाला डेटा एंट्री करताना चुक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या चुकीची दुरुस्ती निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या डेटा एन्ट्रीत करण्यात आल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या चुकीच्या चर्चेला विराम मिळाला आहे.