समुद्रपूर,
maheshwari-girde : तालुक्यातील गिरड येथील शेतकरी कुटुंबातील महेश्वरी गिरडे हिने आणखी एक मानाचा टप्पा गाठत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय युथ कॉनयुज -२०२५ या परिषदेसाठी तिची निवड झाली आहे.
ही परिषद भारत सरकारच्या मंत्रालय युथ अफेअस अॅण्ड स्पोर्ट अंतर्गत माय भारत पोर्टलद्वारे आयोजित करण्यात आली असून ओडिशातील भुवनेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल येथे १४, १५, १६ डिसेंबर रोजी भव्य स्वरूपात होणार आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्रातून केवळ चार प्रतिनिधींची निवड झाली असून, त्यामध्ये वर्धेच्या महेश्वरी गिरडे यांचा समावेश आहे. या आंतरराष्ट्रीय युवा व्यासपीठावर भारताच्या सर्व राज्यांमधील प्रतिनिधी तसेच १० पेक्षा अधिक देशांतील युवा नेते सहभागी होणार आहेत. परिषदेमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, युवा नेतृत्व, उद्योजकता, जागतिक शांतता व होमस्टे पर्यटन विकास या विषयांवर महत्त्वपूर्ण सत्रे घेण्यात येणार आहेत.
एका सामान्य शेतकर्याची मुलगी असलेल्या महेश्वरीने वतृत्व, सूत्रसंचालन, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यामध्ये मोलाचे योगदान देत सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार आणि तैलिक गौरव पुरस्कार अशा अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या निवडीबद्दल भावना व्यत करताना महेश्वरी गिरडे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सर्वोच्च अभिमानाची बाब आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही संधी प्रेरणा ठरावी, हा माझा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.