नागपूर,
Karmanneya School कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सलन्स, बुटीबोरीत इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला होता. एचसीएल टेक, नागपूरचे क्लस्टर हेड सूरज तायडे यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन करत टेकबी या एचसीएल टेकच्या प्रारंभिक करिअर कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा घाटे, संचालिका प्रीती कानेटकर आणि प्राचार्या डॉ. उन्नती दातार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. टेकबी कार्यक्रमातून बारावी नंतर स्टायपेंडसह प्रशिक्षण, नंतर एचसीएल टेकमध्ये नोकरी आणि कामासोबत पदवी-पदव्युत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध असल्याचे तायडे यांनी स्पष्ट केले. Karmanneya School या सत्रामुळे विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील करिअर मार्ग अधिक स्पष्ट झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी निबेदिता साहू यांनी केले.
सौजन्य: उन्नती दातार, संपर्क मित्र