संवादाचा अभाव अंतर वाढवणारा

-मुकुल कानिटकर यांचे प्रतिपादन -मोहिते भाग जनसंगोष्टी

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर, 
mukul kanitkars कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी संवाद हा गुरुकिल्ली आहे. संवादाचा अभाव अंतर वाढवतो व अनेक सामाजिक समस्यांना जन्म देतो, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य मुकुल कानिटकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मोहिते भागातील क्वेटा कॉलनीत श्री कच्छ पाटीदार भवनात जनसंगोष्टी आयोजित करण्यात आली. मोहिते भाग संघचालक रमेश पसारी, सामाजिक कार्यकर्ते रमेश पटेल व्यासपीठावर उपस्थित होते.
 

mukul kanitkar 
 
 
पंच परिवर्तन ही संकल्पना स्पष्ट करताना मुकुल कानिटकर म्हणाले की, खरा बदल नेहमीच स्वतःपासून होतो. स्वतःमधील परिवर्तन कुटुंबात बदल घडवून आणतो, कुटुंबातील बदल समाजात व समाजातील बदल राष्ट्रात प्रवाहित होतो. राष्ट्रीय स्तरावरील हा बदल संपूर्ण सृष्टीला प्रभावित करतो व शेवटी परमेष्टीपर्यंत पोहोचतो. कुटुंब प्रबोधनाबाबत ते म्हणाले की, संयुक्त कुटुंब असणे हे विघटनाचे लक्षण नाही तर कुटुंब विस्ताराचे प्रतीक आहे.mukul kanitkars भारतीय समाजाने तंत्रज्ञानाचा वापर कुटुंबांना एकत्र करण्यासाठी केला आहे, त्यांना विभाजित करण्यासाठी नाही. संस्कार मूल्ये उपदेशातून मिळत नाहीत तर आचरणातून निर्माण होतात. म्हणून, कौटुंबिक वातावरणात संवाद व आदर्श आचरण दोन्ही आवश्यक आहेत. जनसंगोष्टीचा समारोप एका समृद्ध व अभ्यासपूर्ण चर्चेने झाला. विचारांच्या या देवाणघेवाणीमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण व प्रभावी झाला.