ग्रंथालयाच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वर्धेत पदयात्रा

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
hiking-in-wardha : ग्रंथालय तथा कर्मचार्‍यांच्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता शासनाचे लक्ष वेधावे याकरिता डॉ गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार ९ रोजी सकाळी १० वाजता विनोबा भावे समाधी ते वर्धेतील गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
 
 
 
 KO
 
 
यावेळी जिल्हधिनकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमुद केल्यानुसार, ग्रंथालय कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत दर्जा देण्यात यावा, अनेक वर्ष कार्यरत असूनही ग्रंथालय कर्मचारी करारावर अथवा अल्प वेतनावर काम करतात. त्यामुळे त्यांना वरिष्ठ श्रेणी मिळावी, ग्रंथालयाला तिप्पट अनुदान वाढ मिळावी, १००/७५/५० वर्ष पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना विशेष अनुदान देण्यात यावे, ग्रंथ मित्रांना शासनाच्या सवलती मंजूर करावे कराव्या, ग्रंथालयांना शासकीय भूखंड मिळावे. अनुदान सूत्र ९० टके ऐवजी १०० टके मंजूर करावे. उच्च विद्याविभूषित कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, वैद्यकीय सोयी, पाल्यांना उच्च शिक्षणासाठी सवलती, वाहन भत्ता, घर भाडे, गणवेश, अर्जित रजा देण्यात याव्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
 
 
या पदयात्रेत महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, गुलाब पाटील, राम मेकले, भीमराव पाटील, सोपान पवार, डॉ. राजेंद्र मुंढे, डॉ. नारायण निकम, सुनिता खूनकर, अरुण हर्षबोधी, भाऊराव पत्रे, आदी सहभागी झाले होते.