नागपूर,
lokrajya now one click महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम, त्या - त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणे, राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा ‘लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमोल ऐतिहासिक दस्ताऐवज आता डिजीटल फॉरमॅटमध्ये अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर वाचक व अभ्यासकांपर्यंत पोहोचवू, अशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ च्या दुर्मीळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या ५० दुर्मीळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन परिसरात आलेल्या या प्रदर्शनाच्या समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसले, संचालक किशोर गांगुर्डे, नागपूर विभागाचे संचालक गणेश मुळे, गोविंद अहंकारी, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी उपस्थित होते.lokrajya now one click महाराष्ट्रातील लोकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण देशात आकर्षण आहे. राज्यशास्त्र, या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देवू असे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.