पाकिस्तानची लंडनमध्ये अपमान...गृहमंत्री मोहसीन नकवींची गाडी थांबविली

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
लंडन,
Mohsin Naqvi's car stopped लंडनमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाल्याचे चित्र समोर आले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या भेटीदरम्यान ब्रिटिश पोलिसांनी त्यांची गाडी थांबवून कठोर तपासणी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने पाकिस्तानच्या उच्चपदस्थ व्यक्तींनाही परदेशात कोणत्या शंकेच्या नजरेतून पाहिले जाते, हे प्रकर्षाने समोर आले आहे.
 
 
Mohsin Naqvi
 
मोहसीन नक्वी हे लंडनमध्ये अधिकृत भेटीसाठी आले असताना त्यांची गाडी ब्रिटिश पोलिसांनी थांबवली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की तपासणी ही फक्त औपचारिक नव्हती; पोलिसांनी गाडीची चारही बाजूंनी तपासणी करत काटेकोरपणे पडताळणी केली. ही घटना ते ब्रिटिश परराष्ट्र कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना घडल्याचे वृत्तांमधून समोर आले आहे. मोहसीन नक्वी हे फेब्रुवारी 2024 पासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी पंजाबचे कार्यवाहक मुख्यमंत्री आणि सिटी मीडिया ग्रुपचे संस्थापक म्हणूनही काम केले आहे. तरीदेखील, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनाही अशा प्रकारच्या कठोर तपासणीला सामोरे जावे लागले, ही बाब पाकिस्तानसाठी अत्यंत लज्जास्पद मानली जात आहे.
 
यापूर्वीही जगभरात पाकिस्तानी अधिकारी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना अशाच प्रकारचा अपमान सहन करावा लागला आहे. काही महिन्यांपूर्वी तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानचे राजदूत एहसान वागन यांना अमेरिकेत प्रवेश नाकारत विमानतळावरून परत पाठवण्यात आले होते. पाकिस्तानातही नेत्यांवर एकमेकांनी सार्वजनिकरित्या केलेले अपमानास्पद वक्तव्य हे नवीन नाही. अलीकडेच एका पाकिस्तानी खासदाराने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना "सेल्समन" अशी अवमानक उपाधी दिली होती. मोहसीन नक्वी यांच्याशी संबंधित लंडनमधील ही घटना आता पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, जगभर पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती नकारात्मक आहे, याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.