चंद्रकांत लोहाणा
Nagpur Assembly Winter Session काँग्रेस पक्षाने विदर्भाचे पार वाटोळे करुन ठेवले. काँग्रेसच्या आजवरच्या नितीने विदर्भ बकाल झाला. विदर्भाच झालेल उजाड राण ही काँग्रेसचीच देण. त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये असलेल्या अनुशेषाने विदर्भ अजुनही होरपोळतोय. त्याचे चटके अजुनही जाणवते. चाणाक्ष पश्चिम महाराष्ट्राच्या चालाख नेत्यांनी विदर्भाची कायम उपेक्षा केली. विदर्भाच्या वाट्याचा निधी पळविला. आमचे नेते मात्र, आपआपली दुकानदारी थाटण्यातच धन्यता मानु लागले. जवळपास पन्नास वर्षामध्ये विदर्भ आहे, तो तेथेच उभा आहे. सामान्य लोकांनीही हे सर्व निमुटपणे सहन केल. विदर्भामध्येही लोकच राहतात. त्यांनाही आकांक्षा आणि अपेक्षा आहेत, हे पुर्वीच्या सत्ताधिशांच्या लेखीही नव्हते. निवडुन दिलेले लोकप्रतिनिधीही हे सर्व निमुटपणे बघ्याची भुमिका घेऊन गप्प असायचे. आज बेंबीच्या देठापासून ओरडणारे शरद पवार केंद्रामध्ये अनेक वर्ष कृषी मंत्री होते. त्यावेळी त्यांना विदर्भातील शेतकऱ्यांचा कळवळा कधीच आला नाही. उपाशी मरणाऱ्या आपल्याच राज्यातील शेतकèयांसाठी काहीतरी कराव अस शरद पवारांना त्यावेळी का वाटल नाही. कोणी त्यांचे हात बांधले होते. आपल्या सत्तेसाठी त्यांनी फक्त येथील प्रश्नांच भांडवल केल. त्याचा उपयोग करून घेतला. आपआपसात भानगडी लावल्या. अन् एकदुसऱ्याच्या तंगड्या ओढुन आपल बस्तान बसवल. जनता मात्र, होरपळत राहली. ही शोकांतिका विदर्भासाठी दुदैव बनली.
विदर्भ जेव्हा महाराष्ट्र राज्यात सामील झाला त्यावेळी येथील रोजगाराचे प्रमाण राज्यामध्ये सर्वाधिक होते. त्यावेळी कापसाच्या रुपामध्ये पांढर सोन पिकविणारा विदर्भ आघाडीवर होता. परंतु, कायम दुर्लक्षीत विदर्भ प्रदेशाला राजकीय अनास्थेचे ग्रहण लागले. त्यानंतर ही ग्रहदशा अधिकच गडद होत गेली. विणकर आणि यंत्रमाग अडगळित पडले. सिंचन, रस्ते, आरोग्य आणि नोकरीमधील अनुशेष सतत वाढत गेला. त्यानंतर भाजपाच्या सरकारने विदर्भासाठी भरघोस निधी देऊन प्रथमतः आपले लक्ष विदर्भावर केंद्रीत केले.
सुदैवाने यावेळी Nagpur Assembly Winter Session महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे सुपुत्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांना विदर्भाच्या ज्वलंत प्रश्नांची जाण आहे. यावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मनामध्ये आशेचा एक नवीन किरण जागला आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने जनतेमध्येही उत्साह आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकास व्हावा, जनतेचे प्रश्न पटलावर मांडुन त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची परंपरा रुढ झाली. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये हा उद्देश कधीच सफल झाला नाही. हुर्डा पार्ट्या अन् सहलीचेच स्वरुप काँग्रेसने नागपूर अधिवेशनाला दिले. त्यामुळे नागपूर अधिवेशन एक फार्स ठरला. जनताही हे सर्व निमुटपणे बघत राहली. विदर्भामधील वाशीम हा आकांक्षीत आणि मागासलेला जिल्हा. या जिल्ह्याच्या निर्मितीला 25 वर्ष लोटली. अडीच दशकानंतरही या जिल्ह्याच्या व्यथा आजही तश्याच कायम आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन लोकांना अपेक्षा वाढल्या आहेत. या जिल्ह्याचा अनुषेश चुटकी सरशी भरुन काढता येईल, असेही नाही. परंतु, त्याची सुरवात जर या अधिवेशनापासून झाली तर तो एक मैलाचा दगड ठरेल. या जिल्ह्यामध्ये एकही मोठा उद्योग नाही, एकही कारखाना नाही. एमआयडीसी अजुनही भकास पडुन आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्याने रोजगारांसाठी त्यांची भटकंती आजही कायम आहे. त्यामुळे हााताला काम नाही. विदर्भामध्ये वाशीम जिल्हा सोयाबीनचा हब म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे येथे एखादा सोयाबीनवर प्रक्रिया करणारा प्रकल्प जर उभारल्या गेला तर अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळु शकते. नरखेड वाशीम हा रेल्वेमार्ग बडनेèयापर्यंत पुर्ण झाला असून, गेल्या कित्येक वर्षापासून बडनेरा वाशीम हा 130 किमीचा रेल्वेमार्ग थंड्या बस्त्यामध्ये पडला आहे. बडनेरा वाशीम हा रेल्वे मार्ग जोडल्या गेल्यास दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारा महत्वाचा रेल्वेमार्ग ठरु शकतो. त्यासाठी राज्य शासनाने निधीचा वाटा उचलने गरजेचे आहे. या जिल्ह्याच्या सिंचनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नदीजोड प्रकल्पामध्ये वाशीम जिल्ह्याचा समावेश केला आहे. शेतकèयांसाठी ही एक सुखद वार्ता आहे. या प्रकल्पामुळे बèयाच अंशी सिंचनाचा अनुशेष भरुन निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या पदरामध्ये पाडुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जनतेचा रेटा हवा. नेमका येथेच विदर्भ कमी पडला. येथील मातीच्या कणाकणामध्ये हा इतिहास असला तरी लोकप्रतिनिधींची त्यास साथ मिळाली नाही, हे सत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विदर्भाच्या अनेक समश्यांच्या मुळाशी हात घालुन त्या सोडवल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील जनताही आशावादी आहेत.
9881717856