आठवडी बाजारात ‘प्लॅस्टिक बंदी’ विषयक जनजागृती कार्यक्रम

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Major Hemant Zakate Institute मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स, म्हाळगी नगर येथील "Go Green" क्लबतर्फे नुकताच म्हाळगी नगरच्या आठवडी बाजारात ‘प्लॅस्टिक बंदी’ विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
 Major Hemant Zakate Institute
 
विद्यार्थ्यांनी नागरिकांना प्लॅस्टिक वापर टाळण्याचे मार्गदर्शन केले, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगितले व कापडी पिशव्या वाटप केल्या. “प्लॅस्टिक बॅन” असे नारे देऊन पर्यावरणपूरक संदेश दिला. Major Hemant Zakate Institute कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदन मुडे (शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव), मुख्य पाहुणी शिला मुडे (मुख्याध्यापिका), उपमुख्याध्यापिका भारती मानकर, पर्यावरण शिक्षिका जाधव उपस्थित होत्या.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र