नागपूर,
manikrao-kokate : राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. हॅन्डबॉल सुविधा भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील. सन २०२६ मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्र व भारतातील उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.
क्रीडा प्रबोधिनीमधील नव्याने विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक हॅन्डबॉल मैदानाचे उद्घाटन मंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विशेष कार्य अधिकारी रवींद्र नाईक, विभागीय उपसंचालक पल्लवी धात्रक, चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वर्धा आशा मेश्राम, भंडारा - लतिका लेकुरवाळे, गडचिरोली - भास्कर घटाळे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी प्रबोधिनीतील खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळाले असून त्यांच्या प्रशिक्षणाला अधिक बळ मिळाले आहे. आशियाई पातळीवरील अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करणार्या नागपूर जिल्हा जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंचा विशेष सत्कार आला. या आंतरराष्ट्रीय यशामुळे नागपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त (हॅन्डबॉल) सुनील भोतमांगे व आंतरराष्ट्रीय हॅन्डबॉलपटू इंदरजीत सिंग रंधावा यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर क्रीडा मंत्री कोकाटे यांनी लक्ष्यवेध’उपक्रमांतर्गत विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा विज्ञान केंद्रास सदिच्छा भेट दिली.