नागपूरचा पारा ८.८ अंशावर; थंड हवेचा गारठा कायम

विधानभवन परिसरात शेकोटीचा आधार

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
nagpur-temperature : गत काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असून आज यंदाच्या मोसमात प्रथमच पारा ८.८ अंशावर आला. थंड हवेचा गारठा कायम असल्याने नागपूर चांगलेच गारठले आहे. पहाटे आणि सायंकाळी कडाक्याच्या थंडीने जॅकेट, स्वेटर, मफलर लावून बाहेर फिरावे लागत आहे. रात्रीच्या वेळी सिव्हील लाइन्स भागातील रवीभवन, नागभवन, आमदार निवास, विधानभवन परिसरात शेकोटीचा आधार घेतल्याचे येत आहे. विशेषत: कालच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली असून मंगळवारी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.
 

JKL 
 
विदर्भात गोंदिया ८.६ अंश तर नागपूर ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. मागील वर्षी १४ डिसेंबरला ७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. थंडीने विक्रमाकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आज सकाळपासून कालच्या तुलनेत थंडी वाढल्याची अनुभूती नागपूरकरांना आली. उत्तर भारतात थंडीची लाट असून पंजाबच्या आदमपूरचा रात्रीचा पारा २.२ अंशावर पोहचला आहे. त्या प्रभावाने विदर्भही गारठला असून पुढचे काही दिवस थंड लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.