नागपूर,
Vishwa Hindu Parishad विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक-पुरोहित आयामतर्फे नागपूर येथे आयोजित प्रांतस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात संघटन महामंत्री मिलिंदजी परांडे यांनी “हिंदूंची मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होऊन समाजाच्या स्वाधीन झाली पाहिजेत” असे आवाहन केले. मंदिरातील दानराशीचा उपयोग मंदिर व भाविकांच्या सेवेसाठी व्हावा यासाठी कायद्यात बदल आणि जनजागरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिराच्या उद्घाटन सत्रात प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख आणि संपर्कप्रमुख अरुणजी नेटके यांनी मंदिराद्वारे राबविणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. Vishwa Hindu Parishad केंद्र संपर्कप्रमुख अनिलजी सांबरे यांनी कार्यकर्त्यांचे गुण, संघटनात्मक रचना व योजना अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात अनंतजी पांडे यांनी “मंदिर देशाची उर्जा केंद्रे असून समाजपरिवर्तनासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे” असे सांगितले.
कार्यक्रमात ११० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. Vishwa Hindu Parishad सचिव दिलीप शहाकार यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उद्धव चौधरी यांची नवीन आयाम सहप्रमुख म्हणून घोषणा झाली.
सौजन्य: आशिष घाटे, संपर्क मित्र