गोविंदगाथा नाटकासह स्नेह संमेलन

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Pandit Bacharaj Vyas Vidyalaya पंडित बच्छाराज व्यास विद्यालय इंग्रजी माध्यमाचे वार्षिक स्नेह संमेलन झाले व या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित ‘गोविंदगाथा’ हा महानाट्य सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी केले. त्यांनी शाळेत वर्षभरात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम तसेच यंदाचा प्रथम विज्ञान प्रदर्शनाबाबत माहिती दिली.
 Pandit Bacharaj Vyas Vidyalaya
 
मुख्य पाहुणी म्हणून उपस्थित सीमा रविंद्र देशपांडे यांनी कृष्ण आणि अर्जुन यांचे संबंध, तसेच जीवनात कृष्णासारखी तरलता, समरसता व एकतानता अंगिकारण्याचे महत्त्व सांगितले. Pandit Bacharaj Vyas Vidyalaya भारतीय शिक्षण मंडळाचे सचिव ॲड. उपेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांना राम, कृष्ण यांचे चरित्र जाणून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले व शाळेचे कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत रचना पत्की, तर आभार प्रदर्शन रोहिणी पंचभाई यांनी केले. शाळेचे अध्यक्ष संजय शिरपूरकर, विदर्भ बुनियादी हायस्कूलच्या प्राचार्या आणि इतर गणमान्य उपस्थित होते.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र