पुसद शहराकरिता रिंग रोड जमिनीचे भूसंपादनास मंजुरी

pusad-ring-road-drone 22 ते 23 महिने होऊन गेल्याने अधिकारी सुस्त

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
रवी देशपांडे
 
पुसद, 
 
pusad-ring-road-drone पुसद शहराकरिता रिंगरोड जमिनीचे भूसंपादन व बांधकाम करण्याकरिता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हा शासन निर्णय 15 जानेवारी 2024 झाला असून त्यासाठी 48 कोटी 64 लाख एवढा निधी 2024 मध्ये मंजूर झाला होता. या रिंगरोडचे सरेखा अलाइनमेंट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून पुणे येथील सार्थक इंजिनीयरिंग प्रोप्रायटर शहा या सर्वेअरची नियुक्ती करण्यात आली.
 
 
 

pusad-ring-road-drone 
 
(रिंग रोडचे सर्वेक्षण सुरू असताना) 
 
pusad-ring-road-drone या सर्वेचे काम 15 जानेवारी 2024 पासून तीन महिन्यांच्या कालावधीत बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी करून घ्यावयाचे असताना हे रिंगरोड अलाइनमेंटचे काम आजपर्यंत 22 ते 23 महिने उलटले असून आजपर्यंत केले नाही. हे काम करण्यासाठी रिंग रोड कृती समितीचे अध्यक्ष अशोक बाबर यांनी वारंवार निवेदने दिलीत. 2024 या वर्षात रिंग रोड अलाइनमेंट व बांधकाम पूर्ण न केल्यामुळे 2024 च्या व 2025 या दोन वर्षांच्या आर्थिक वर्षात काम न केल्यामुळे या रिंगरोडच्या किंमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ जनतेच्या खिशाला व शासनाच्या तिजोरीला झळ पोहोचवणारी आहे. शहराच्या बाहेरून येणारी जड वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन निष्पाप ग्रामीण व शहरी लोकांचे बळी घेतात. जड वाहनाखाली अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
 
 
 
pusad-ring-road-drone रहदारीच्या ताणामुळे पोलिस खात्याच्या वाहतूक विभागालासुद्धा या जड वाहनास व जनतेस नियंत्रण करण्यास त्यांना कठीण झाले आहे. शहर विकास आराखडा 1998 रोजी मंजूर झाला असून त्यामध्ये असंख्य डीपी रोडचा समावेश आहे. त्यापैकी या बाहेर गावावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्याकरिता महत्त्वाचे तीन डीपी रोड आहे. त्यात महत्त्वाचा डीपी रोड क्रमांक 1 पुसद-दिग्रस महामार्ग पूसनदीच्या बाजूने जलशुद्धीकरण केंद्राकडून जाणारा भोजला फाटा वाशीम मार्गावरील रेस्टहाऊसच्या समोर निघणारा हा बायपास डीपी रोड 1 किमी लांबीचा पुसद नपने आजपर्यंत विकसित केला असता तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जड वाहनाचा ताण कमी झाला असता. अपघाताचे प्रमाण कमी झाले असते.