शिवस्वरुप प्रीमियर लीगचा विजेता राजगड रॉयल्स

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
rajgad royals राजगड रॉयल्स क्रिकेट क्लबने सिंहगड फायटर्सला पराभूत केले. शिवस्वरूप ढोल ताशातर्फे आयोजित शिवस्वरूप क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सेंट्रल एवेन्यू जवळील आंबेडकर चौकाजवळील बाबुळवन मैदानावर घेण्यात आली होती. राजगड कर्णधार वृषभ भांडारकर तर उपकर्णधार शैलेश बिंड हे होते.
 

राजगड रॉयल्स क्रिकेट क्लब 
 
 
मालिकावीर पुरस्कार गुंजन मेश्राम याला देण्यात आला. त्याने १४१ धावा केल्या होत्या. तसेच उत्कृष्ट फलंदाज - गुंजन मेश्राम, उत्कृष्ट गोलंदाज शैलेश बिंड (५ गडी), अष्टपैलु खेळाडू अजिंक्य इटनकर (४२ धावा, ४ गडीबाद, २ उत्कृष्ट झेल) या सर्वांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे आली. rajgad royals उपविजेता संघातर्फे सिंहगड फायटर्सचे कर्णधार भावेश पागडे व उपकर्णधार वृत्तांत कुर्वे यांनी नेतृत्त सांभाळले होते