‘भाई यह किस लाइन में आ गए…’ अश्विनने शेअर केला सनी लिओनीचा फोटो

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Ravichandran Ashwin : भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सोशल मीडियावर आपल्या बेधडक आणि मजेशीर अंदाजासाठी ओळखला जातो. क्रिकेटमधील कोणताही मुद्दा असो, तो त्यावर आपली मते स्पष्टपणे मांडतो. याच दरम्यान, 9 डिसेंबरला त्याने अचानक आपल्या X अकाऊंटवर अभिनेत्री सनी लिओनीचा फोटो पोस्ट करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले.
 

ASHWIN AND SUNNY 
 
 
 
या पोस्टमुळे चाहते एकदम गोंधळले आणि कमेंट सेक्शन मजेदार प्रतिक्रियांनी भरून गेला. अनेकांनी मजाक करत विचारलं, “भाई, हे कुठल्या लाईनमध्ये आलात?” तर काहींनी मीम्स टाकून लिहिलं, “अश्विन अण्णाचं अकाऊंट हॅक झालंय का?” पण प्रत्यक्षात अश्विनचा संकेत सनी लिओनीकडे नव्हता.
 
अश्विनने सनीच्या फोटोसोबत चेन्नईतील “संधू स्ट्रीट” नावाच्या रस्त्याचाही फोटो पोस्ट केला होता. तमिळमध्ये “संधू” म्हणजे बारीक किंवा अरुंद रस्ता. त्यामुळे त्याने दोन्ही फोटो जोडून “सनी संधू” असा संदर्भ दिला. मग प्रश्न निर्माण झाला-हा सनी संधू कोण?
 
 
 
 
सनी संधू हा तमिळनाडूचा युवा ऑलराउंडर असून सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये त्याने आपल्या धडाकेबाज खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. 8 डिसेंबरला सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त 9 चेंडूत 30 धावांची तुफानी खेळी केली. त्यावेळी तमिळनाडू अडचणीत होता-सहा विकेट पडलेल्या, आणि चार षटकांत 40 धावा हव्या होत्या. अशा परिस्थितीत त्याने चेतन सकारियाच्या एका षटकातच 26 धावा कुटल्या. त्याच्या या पारीत तीन चौकार आणि दोन षटकार होते. बीसीसीआयनेही त्याचा व्हिडिओ शेअर केला.
 
 
 
सनी संधू आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्येही दिसणार आहे. 350 खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव आहे. अबू धाबीत 16 डिसेंबरला होणाऱ्या नीलामीत तो महत्त्वाचा अनकॅप्ड खेळाडू ठरू शकतो. 22 वर्षीय सनी हा डावखुरा वेगवान गोलंदाज असून खालच्या फळीमध्ये जलद धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याचा बेस प्राईस 30 लाख ठेवण्यात आला आहे. अश्विनचा पोस्ट हा त्याच या उदयोन्मुख खेळाडूविषयी इशारा होता, जो लवकरच आयपीएलमध्ये एखाद्या संघाची मोठी पसंती ठरू शकतो.