गणेशपेठच्या कँटीनमध्ये अस्वच्छता - दुर्गंधी

- कँटीनचा परवाना रद्द करण्याच्या सूचना - मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बसस्थानकाला अचानक भेट

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
नागपूर,
ganeshpeth canteen एसटी महामंडळाच्या गणेशपेठ बसस्थानकाला परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसाधनगृह, उपहारगृह, चौकशी कक्ष, प्रवासी चालक-वाहक विश्रांतीगृह आदींची तपासणी केली. तपासणी दरम्यान गणेशपेठच्या कँटीनमध्ये अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आली. यावर प्रताप सरनाईक यांनी तत्काळ कारवाईचे करण्याचे आदेश देत कँटीनचा परवाना रद्द करण्याच्या सूचना महानगरपालिकेलाही दिल्या आहे.
 

प्रताप सरनाईक  
 
 
प्रवाशांना ३६५ दिवस सुविधा द्या
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्थगित झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणेशपेठ बसस्थानकाला भेट देण्याचे ठरविले. एसटीच्या प्रशासनाने केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका, तर वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.
हिरकणी कक्षात महिला कर्मचारी नियुक्त करा
बसस्थानकावरील बसच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थी आणि प्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा आढावा घेतला. महिला प्रवाशांसाठी विशेषतः मातांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाची तपासणीही करण्यात आली.ganeshpeth canteen केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हिरकणी कक्ष निर्माण करु नका ते अद्यायावत करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करा, असे निर्देश दिले.