तभा वृत्तसेवा
पुसद,
farewell-teacher-retirement : पंचायत समिती लोणी येथील शिक्षक नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना आरेगाव केंद्रातील शिक्षकांनी व गावकèयांनी मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप दिला. पुसद पंचायत समिती आरेगाव केंद्रातील लोणी येथील जिप प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रकांत जामगडे हे नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन आरेगाव केंद्रातर्फे लोणी येथील प्राथमिक शाळेत करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेषराव पुलाते, सरपंच अनिल रत्ने, माजी सरपंच किशोर काळे, पोलिस पाटील विवेक कांबळे, प्रतिष्ठित नागरिक भाऊराव बोडखे, शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मनोज रामधनी, आरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मनीष राठोड, मोहन भालेराव, गणेश शिंदे, माधव गव्हाणे, सागर राऊत यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती.
गावकèयांनी चंद्रकांत जामगडे यांचा व त्यांच्या पत्नी वनिता जामगडे यांचा शाल, श्रीफळ, साडीचोळी व भेट वस्तू देऊन सत्कार केला. यावेळी भाऊराव बोडखे, मनोज रामधनी, मनिष राठोड, उत्तम डाखोरे जामगडे यांच्या कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना जामगडे यांनी तेहतीस वर्षाच्या कार्यकाळात सहकार्य केलेले अधिकारी, सहकारी शिक्षक, कर्मचारी व गावकèयांचे आभार मानले. यावेळी लोणी शाळेतील नवनियुक्त शिक्षक पल्लवी बलखंडे यांचा ग्रामपंचायत व केंद्रप्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षण परिषदेचे महत्त्व व नवीन चालू घडामोडीची माहिती मनीष राठोड यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन महेश पाल यांनी केले. तर उपस्थितांचे आभार इमरान यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन शिक्षक सुनील संगावार यांनी केले. कार्यक्रमाला आरेगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.