नागपूर,
vijay-vadettiwar : सोयाबीनला भाव मिळावा, शेतकर्यांनी कर्जमाफी मिळावी, अशी मागणी करीत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केले. यावेळी सतेज पाटील, आदित्य ठाकरे, शशिकांत शिंदे, भास्कर जावध आदी सहभागी झाले होते.
मुख्यत: सोयीबीनच्या खरेदीच्या भावातील फरक मिळावा, अशी मागणी करीत सत्तापक्षाचे लक्ष वेधण्यात आले. राज्यातील कांदा उत्पादन शेतकरी संकटात आहे. कमी दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकर्यांना वेळीच कर्जमाफी द्या, अशी मागणी करण्यात आली. कापसाच्या माळा घालून विरोधी आमदारांनी कापूस उत्पादक शेतकर्यांना हमी भाव मिळावा, अशी मागणी केली.