तभा वृत्तसेवा,
यवतमाळ,
blood-donation-camp : स्वामी विवेकानंद स्मारकाच्या भव्य अनावरण सोहळ्याच्या शुभप्रसंगी तसेच राष्ट्रीय युवा दिन व माँ जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर, गोधनी, यवतमाळ येथे करण्यात आले आहे. 12 जानेवारी रोजी होणाèया या शिबिरात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आर्णी येथील रक्तदान शिबिरात 112 रक्तदात्यांनी केले रक्तदान
रोटरी क्लब ऑफ आर्णीच्या वतीने जुन्या यवतमाळ अर्बन बँकेच्या जागेवरील हालमध्ये व फुलो झानो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ आर्णीच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले.
फुलो झानो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही जागेवरील रक्तदान शिबिरात शहरातील 112 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी यवतमाळ येथील शौर्य ब्लड केंद्राचे डॉ. प्रमोद राठोड, डॉ. शिवशंकर भताने, जया आडे, श्रुती कटरे, कल्याणी पटले, रूतुजा मडके, रोशनी कटरे, सूरज मगर, प्रथमेश बनसोड यांनी सहकार्य केले.
या शिबिरासाठी श्रीपाल कोठारी, अमित मोतेवार, नासीर खाकरा, स्वप्निल दुगड, अमन बेग मिर्झा, हिमांशु राठी, प्रयास छल्लाणी, राजेश नालमवार, सतिश केशववार, डॉ. हार्दिक जैन, यश लिंगावार, अक्षय चिंतावार, अथर्व लोळगे, अथर्व चिंतावार, नीरज लोया, श्रीनिवास कोषटवार, शानवाज बेग, निखिल बेलगमवार, अजिंक्य चिंतावार यांनी परिश्रम घेतले.