तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
nylon-manja-sales : जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नायलॉन मांजाविक्री करणाèयावर जिल्ह्यात बंदी केली आहे. त्यानंतर पोलिस विभागाला जाग आली असून यवतमाळ शहर हद्दीतील मारवाडी चौक येथे पतंग विक्री व्यवसाय करणाèयावर कारवाई केली आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणाèया व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यावरून माहिती यवतमाळ शहर पोलिस ठाणे हद्दीतील मारवाडी चौक येथे पतंग विक्रीचा व्यवसाय करणारा कृष्णकुमार उर्फ बंटी सिओटिया हा स्वत:चे दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीकरिता आहे. अशी गोपनीय माहिती मिळाल्याने व त्याच्याकडे नायलॉन दोरा, मांजा यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असतानादेखील मागील आठवड्यापासून तो विक्री करीत आहे.
मांजा विक्री संदर्भात माहिती मिळाल्यावर मारवाडी चौक येथील पतंग विक्री करणाèया दुकानात पोलिस पथकाने धाड टाकली असता मांजा विक्री करताना आढळला. पंचासमक्ष पांढèया रंगाच्या पोत्यात पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला, ज्यामुळे पक्षी, प्राणी व मानवाला दुखापत करणारा नायलॉन मांजा, गोल्ड नायलॉन मांजा 13 बंडल, प्रती 700 रुपयांप्रमाणे 9 हजार 100 रुपये, नायलॉन मांजा चकरीमध्ये गुंडाळलेला 13 चकरी 300 रुपयांप्रमाणे 3 हजार 900 रुपये असा 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कायदेशीर कारवाई करण्यासाठी आरोपीला यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात मनीष गावंडे, गजानन राजमलू, सै. साजीद, योगेश गटलेवार, अजय डोळे, रूपेश पाली, योगेश डगवार, रितुराज मेडवे, सचिन घुगे, सुनील पैठणे, देवा होले, आकाश सूर्यवंशी यांनी पार पाडली.
प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्री करणाèयावर पोलिसांची धाड
शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन चायना मांजा विक्री करणाèया ईसमावर कारवाई करून त्याकडून 12 नॉयलॉन मांजा बंडल जप्त करण्यात आले. ही कारवाई शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडली.
पथकाला कळंब चौक कुंभारपुरा येथे नायलॉल मांजा व पंतगांची मोहंमद शहेबाज शेख सत्तार (वय 40 वर्ष) याच्या किराणा दुकानात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याच्या किराणा दुकानजवळ पोलिस गेले असता पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. यावेळी स्थानिक पंचाच्या मदतीने दुकानाची झडती घेतली असता पांढèया रंगाच्या पोत्यात 12 नायलॉन मांजाचे चक्री बंडल 3 हजार 600 रुपयांचे व नायलॉन मांजा मिळुन आला. पंचनामा करून आरोपीविरूद्ध 223, 293 भान्यासं सहकलम 7, 17 पर्यावरण सरंक्षण अधीनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरिक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरणचे पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद सरकटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईवाडे, किरण पडघन, प्रदीप कुरडकर, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, अभिषेक वानखडे, प्रतीक नेवरे यांनी केली.