शेषराव पाटील सहकारी जिनिंग प्रेसिंग अध्यक्षांवर 13 संचालकांचा अविश्वास

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
sheshrao-patil-cooperative-ginning-pressing : स्व. शेषराव पाटील सहकारी जिनींग व प्रेसिंग अध्यक्षचे अध्यक्ष विजय चव्हाण यांच्यावर संस्थेच्या 13 समिती सदस्यांनी अविश्वास असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांना दिल्याने येथील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. यात उपाध्यक्ष राजेश मल्हारी सोळंके यांच्यासह, संजय दत्तराव लोंढे, शरद शेषराव पाटील, प्रकाश रामराव वायकुळे, इकबाल अहेमद अहेमद खाँ मिर आलम खान, गुलाब जेसा राठोड, प्रकाश चर्तुभूज बोंबले, अवधूत भाऊराव पाटील, प्रताप अप्पाराव देशमुख, संतोष धोंडीअप्पा घळे, दीपक लक्ष्मण जाधव, विद्या पुरुषोत्तम डुबेवार, शांता साहेबराव ठेंगे या संचालकांचा समावेश आहे.
 
 
 
KL
 
 
 
त्यांनी दिलेल्या पत्रात अध्यक्ष विजय भोपासिंग चव्हाण विरुद्ध अविश्वास प्रस्तावावर चर्चा, विचारविनिमय करुन योग्य निर्णय घेण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्याची मागणी केली आहे. कोणत्याही विषयावर संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी करुन चुकीचे निर्णय घेतल्या जात असल्याने संचालकांना सभेत येण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे संस्थेच्या नुकसानीस कारण नसताना संचालक जबाबदार ठरत आहेत.
 
 
संस्थेचे दैनंदिन कामकाज सुरळीत न चालविणे, संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे प्रक्रिया उद्योग न करता संस्थेच्या हिताला हानी पोहोचणे, यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले, संस्थेत कापसाची खरेदी व प्रकीया उद्योग करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून बंद असूनही अध्यक्ष कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षावर विश्वास राहीला नसून त्यांच्याविरुद्ध हा अविश्वास प्रस्ताव नियमानुसार दाखल करीत असल्याचे पत्रात नमूद आहे.
 
 
सहकारी कायद्याचे कलम 57 अ अन्वये जिल्हा उपनिबंधक संस्थेचे नियंत्रीत अधिकारी असल्यामूळे संस्थेच्या विद्यमान अध्यक्षांचा अविश्वास ठराव त्वरित पारित करुन अध्यक्ष पदाची निवडणुक घेण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.