मुक्त विद्यापीठाची डिजीटल विद्यापीठ म्हणून ओळख : डॉ. जयंत वडते

ycmou-digital-university आज विद्यापीठ सर्वोच्च शिखरावर

    दिनांक :09-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
यवतमाळ,
 
ycmou-digital-university यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकची देशात डिजिटल विद्यापीठ म्हणून ओळख झाली आहे. पारंपरिक विद्यापीठाच्या अगोदरच प्रवेश प्रक्रियेसह परीक्षा आणि इतर सर्व व्यवस्था ऑनलाईन करून विद्यापीठाने नवा इतिहास घडवून ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचे कार्य केल्याचे प्रतिपादन विभागीय संचालक डॉ. जयंत वडते यांनी केले. ते 9 डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील अभ्यास केंद्रांच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळचे अध्यक्ष प्रदीप वादाफळे होते.
 
 
 
 
ycmou-digital-university
 
(कार्यक्रमात बोलताना डॉ. जयंत वडते. सोबत इतर मान्यवर) 
 
ycmou-digital-university केंद्र संयोजकाचे प्रतिनिधी सुधर्म हांडे, सहायक कक्ष अधिकारी अमोल पाटील, प्राचार्य विलास राऊत, मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय प्राचार्य ठाकरे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. वडते म्हणाले, मुक्त विद्यापीठाला सर्वोच्च शिखरावर नेण्याचे कार्य सर्व अभ्यास केंद्रांनी केले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आज विद्यापीठ सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहे. पारंपारिक विद्यापीठाच्या तुलनेत मुक्त विद्यापीठ अग्रेसर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेतून अभ्यास केंद्राच्या विविध समस्या सोडविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अभ्यास केंद्रातील केंद्र संयोजक, सहाय्यक, समंत्रक तसेच परीक्षा काळात लागणाèया विविध मनुष्यबळाच्या मानधन वाढीचा विषय विद्यापीठात आपण लावून धरू, असे त्यांनी आश्वासन दिले.
 
 
 
ycmou-digital-university कार्यशाळेचे प्रास्ताविक अमोल पाटील यांनी करून न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत या वर्षापासून विद्यापीठाने अंमलबजावणी सुरू केली आहे आणि सेमिस्टर पॅटर्नप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अमरावती येथे विभागीय रोजगार मेळावा 27 जानेवारी रोजी युवा शक्ती फाउंडेशन आणि विभागीय केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी ही मुक्त विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
ycmou-digital-university कार्यशाळेचे संचालन प्रा. बीयू लाभसेटवार यांनी केले. कार्यशाळेला यवतमाळ जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे संस्थाचालक, केंद्रप्रमुख, प्राचार्य, केंद्र संयोजक, केंद्र सहाय्यक, तांत्रिक सहायक, समंत्रक, शिपाई यांच्यासह मुक्त विद्यापीठातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेसाठी मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाचे केंद्र संयोजक प्रा. अतुल वानखेडे, प्रा. बीयू लाभसेटवार, डॉ. गजानन निचत, प्राचार्य अरविंद लाडोळे, प्रा. आनंद तायडे, प्रा. शरद ठाकरे, प्राचार्य कृपा पटेल, प्राचार्य संगीता डांगे, प्रा. आनंदसिंग ठाकूर यांनी परिश्रम घेतले.