सोलापूर,
Young man commits suicide due to dancer सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील साई कला केंद्राशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अश्रुबा कांबळे (वय 25), रुई ढोकी गावचा रहिवासी, कला केंद्रातील नर्तिकेसोबतच्या प्रेमसंबंधातून झालेल्या किरकोळ वादानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
माहिती नुसार, मृतक आणि नर्तिका शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. परत येताना, नर्तिकेला त्याच्या बायकोचा फोन आल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर अश्रुबाने धमकी दिली की तो आत्महत्या करणार आहे. मात्र, नर्तिकेने त्याच्या धमकीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. काही वेळानंतर, अश्रुबाने गळफास घालून जीवन संपवले. घटनास्थळी येरमाळा पोलीस दाखल झाले, पंचनामा केला आणि पोस्टमार्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी आरोपी महिलेलाही ताब्यात घेतले असून, तिच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. या घटनेने धाराशिव तालुक्यात खळबळ उडाली आहे.