श्रीराम मंदिर बजाज नगर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा

    दिनांक :01-Apr-2025
Total Views |
नागपूर , 
 Shri Ram Mandir Bajaj Nagar सुमारे १ ८ वर्षांपूर्वी बजाज नगर येथे श्रीरामाचे मंदिर उभारण्याचा मानस व्यक्त केला गेला. मंदिराचे भूमिपूजन आत्ताचे मुख्यमंत्री  देवेंद्रज फडणवीस व आमदार संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले होते . प्रथमतः छोटेखानी मंदिराची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या मंदिरातील चांगल्या प्रकारचे बदल बजाज नगरवासीयांनी अनुभवले आहेत .
 

pratima  
 
 
 
यावर्षी श्रीराम सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांच्या , भक्तांच्या आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने श्रीराम मंदिराचा सभामंडप उभा केला गेला . त्याचे अजूनही बरेच काम बाकी आहे. Shri Ram Mandir Bajaj Nagar प्रभू रामचंद्र आपल्याकडून सर्व त्रुटी पूर्ण करून घेतील .गुढीपाडव्यापासून तर रामनवमी पर्यंत या मंदिरात दररोज सायंकाळी ७  वाजता गणेश स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा याचे पठण केले जाते . या व्यतिरिक्त कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे . सर्व नागपूरवासीयांनी या मंदिराला आवर्जून भेट द्यावी .असे आवाहन मंदिर समिती तर्फे करण्यात आले आहे . 
सौजन्य: प्रतिमा माटेगांवकर,संपर्क मित्र