पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले
नवी दिल्ली,
PM Modi ‘दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत चर्चा आणि व्यापार एकाच वेळी सोबत चालणार नाहीत. भारत यापुढे दहशतवादी संघटनांना पाठीशी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना यांच्यात फरक करणार नाही. पाकिस्तानच्या विरोधातील कारवाई सध्या केवळ स्थगित करण्यात आलं आहे, बंद नाही,’ अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला.
आपल्या संबोधनाला सुरुवात करताना त्यांनी भारतीय सेना, गुप्तचर यंत्रणा आणि वैज्ञांनिकांना उत्तम कामाच्या शुभेच्छा दिल्या. ‘आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरला पूर्ण करताना असीम शौर्य दाखविलं. आमच्या आयाबहिणींचे कुंकू पुसणाèयांना काय परिणाम भोगावे लागतात, हे आता त्यांना कळलं आहे. PM Modi यापुढे, ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखी कारवाई भारतासाठी ‘न्यू नॉर्मल’ असणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या केवळ २२ मिनिटांच्या संबोधनातून पंतप्रधानांनी नागरिकांच्या मनात शस्त्रसंधीविषयी असलेल्या शंका दूर केल्या आहेत.
‘पहलगामवरील हल्ल्याचा उल्लेख करून, तो हल्ला दहशतवादाचा बीभत्स चेहरा होता. देशाची सद्भावना मोडीत काढण्याचा प्रयत्न होता आणि हे माझ्यासाठी वैयक्तिक दु:खदायक होते. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सरकारला पाठींबा दिला आणि दहशतवादविरोधी कारवाईसाठी भारतीय लष्कराला पूर्ण सूट दिली. PM Modi यातून 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आणि दहशतवाद्यांच्या निर्मितीसाठीच्या पायाभूत यंत्रणा पूर्णपणे उध्वस्त करण्यात आल्या. पाकिस्तानने इतर देशांकडे मदतीसाठी धाव घेतली. हतबल आणि निराश झाल्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाक सैन्याकडून आपल्या डीजीएमओला संपर्क करण्यात आला,’ असा घटनाक्रम पंतप्रधानांनी सांगितला.
आगामी काळात पाकिस्तानच्या कारवायांकडे आमचे बारीक लक्ष राहणार असून, त्यात गल्लत असल्यास भारत सडेतोड उत्तर देईल. यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा होईल ती फक्त पीओके आणि दहशतवादावरच! पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांच्या वापराच्या धमकीला भीक घालणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. PM Modi पंतप्रधान म्हणाले की, आज बुद्ध पौर्णिमा आहे. त्यांनी शांतीचा संदेश दिला आणि शांतीचा मार्ग शक्तीतूनच जातो. मानवता शांती आणि समृद्धीत रुपांतरीत विकसित भारतासाठी शक्तीशाली होणे आवश्यक आहे आणि गरजेनुसार शक्तीचा वापर केलाच जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत दहशतवादाच्या मुळावर निर्णायक घाव करेल, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.