भाजप उद्योग आघाडीच्या नव्या घोषणा
नागपूर
नवरात्रीपासून अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये एक मोठा आणि ऐतिहासिक बदल झाला आहे. GST reforms जीएसटीच्या सुधारणेमुळे कर रचना अधिक सोपी झाली असून, अनेक वस्तूंवरील कर कमी झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होणार आहे. एकंदरीत जीएसटीच्या या सुधारणा आपल्या देशासाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास माजी खासदार आणि अजय संचेती यांनी व्यक्त केला.
भाजप उद्योग आघाडीच्या वतीने चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, येथे नागपूर शहराच्या नव्या कार्यकारणीच्या घोषणा करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, समीर बाकरे, गिरीश व्यास, संदीप जाधव, मनिषा धावडे, श्रीकांत आगलावे, भाजप उद्योग आघाडीचे संरक्षक जुल्फेश शाह, भाजपा सेलचे अध्यक्ष महिपाल जैन (सेठी) आदी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्राला जीएसटीचा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन देशाच्या हितासाठीच GST reforms जीएसटीचे दोन मुख्य स्लॅब ५टक्के आणि १८ टक्के निश्चित केले आहेत. उद्योग क्षेत्राला याचा लाभ होईल, असा विश्वास दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी समीर बाकरे, जुल्फेश महिपाल जैन यांनी मार्गदर्शन केले. भाजपा उद्योग आघाडीच्या सर्व २७ पदाधिकार्यांचे स्वागत करण्यात आले.