कबड्डी स्पर्धा
नागपूर,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ श्री बिंझाणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झोन ‘डी’ व झोन ‘एच’ पुरुष विभागाच्या Kabaddi Tournament कबड्डी स्पर्धा २० ते २२ सप्टेंबर २०२५ दरम्यान उमरेड रोडवरील श्री बिंझाणी नगर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडल्या.
उपांत्य फेरीतील एक लक्षवेधी सामना डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालय, सावनेर व एस.एस.एन.जे. महाविद्यालय, देवळी यांच्यात हा अत्यंत अटीतटीचा ठरला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयाने अवघ्या १ गुणाच्या फरकाने, म्हणजेच ५०-५१ अशा रोमांचक निकालाने विजय मिळविला व अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. उपान्त्य फेरीत ज्ञाननंद महाविद्यालय, देवळी आणि एस.एन. मोर महाविद्यालय यांच्यात सामन्याचा थरार अनुभवायला मिळाला. या सामन्यात ज्ञाननंदने ३२-३५ अशा गुणांनी विजय मिळवला व अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली.
या Kabaddi Tournament स्पर्धेचे यशस्वी आयोजन डॉ. संजय चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये प्राचार्य डॉ. सुजित मेत्रे, प्रा. डॉ. प्रशांत बांबल, निवड समिती अध्यक्ष प्रा. डॉ. मनोज आंबटकर, प्रा. डॉ. भोयर, डॉ. आदित्य सोनी यांच्यासह अनेक मान्यवरांची होती.