स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतमहायुती नाईक भावंडाना कसे सामावून घेणार ?

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
रवी देशपांडे, 

पुसद :
१९५२ पासून Pusad Naik family पुसदमध्ये नाईकांची सत्ता आहे. अनेक राजकीय समीकरणे तयार झाली, बदलली. परंतु नाईकांचेच वर्चस्व राहिले. सध्या नाईक परिवार एकसंध राहिलेला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून इंद्रनील मनोहर नाईक लढले. त्यांच्या विरोधात त्यांचे सख्खे चुलत भाऊ अ‍ॅड. निलय नाईक यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून जोरदार लढत दिली.
 
 
pushad naik
 
मागील लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम मतदारसंघात भाजपाने शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना समर्थन त्याचप्रमाणे महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असल्यामुळे आमदार इंद्रनील नाईक यांनीही राजश्री पाटील यांचे काम केले. त्यामुळे अ‍ॅड. निलय आणि अ‍ॅड. इंद्रनील नाईक एकत्र आले. विधानसभा निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी अजित पवारांच्या उमेदवारांना महायुतीचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला. ९४ हजारांच्या मताधिक्याने इंद्रनील नाईक निवडून आले आणि राज्यमंत्री बनले. साहजिकच २०१९ विधानसभा निवडणुकीत निलय नाईकांना मिळालेली ८० हजार मते इंद्रनील नाईक यांच्याकडे वळती झाली.
 
 
Pusad Naik family  त्यानंतर विधान परिषद सदस्य अ‍ॅड. निलय नाईक यांची सहा वर्षांची टर्म पूर्ण झाली आणि ते सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडले. अशातच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे ज्येष्ठ बंधू ययाती नाईक यांनी थेट दिल्ली गाठून भाजपात प्रवेश केला. परंतु भाजपात नवीन आहेत. यामुळे नाईक घराण्यामध्ये सत्ताप्राप्तीसाठी आता एक प्रकारची स्पर्धा आहे. निलय नाईक, ययाती नाईक व राज्यमंत्री इंद्रनील नाईक या तीन भावंडांमध्ये नाईक समर्थक विभागल्या गेले आहेत. त्यामुळे नाईकांची शक्तीही गटा-तटात विभागली जाणार. हे तीनही भावंडं महायुतीत असले तरीही त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामावून घेणे ही कसरत आहे. पाहूया, महायुती या तीनही भावंडाना कसे सामावून घेतात ते. एका म्यानामध्ये दोन तलवारी राहत नाहीत, इथे तर तीन आहेत..!