आता तत्काळ शिक्षक पदभरतीची अपेक्षा
यवतमाळ,
यवतमाळ जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला बिंदुनामावलीचा अखेर सुटला आहे. शासनाने नुकत्याच ३२ पदांपेक्षा जास्त पदसंख्या असलेल्या संस्थांसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयानंतर आता ३२ पदांपेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संस्थांसाठीही बिंदुनामावलीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. गत अठरा महिन्यांपासून एससीबीसी आरक्षणानंतर Teacher recruitment शिक्षक पदभरतीसाठी संस्थांना आवश्यक असलेली बिंदुनामावली फक्त पेक्षा जास्त पदसंख्या असलेल्या संस्थांसाठी लागू होती. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील बहुतेक संस्था या ३२ पेक्षा कमी पदसं‘या असलेल्या असल्याने संपूर्ण जिल्हा भरती प्रकि‘येतून वंचित राहिल्या होत्या.
याच काळात पवित्र पोर्टल अंतर्गत झालेल्या शिक्षक भरती प्रकि‘येत यवतमाळ जिल्ह्याची नामावली अपडेट नसल्यामुळे जिल्ह्यात एकही शिक्षक मिळू शकला नव्हता. ही बाब जिल्ह्यातील व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरत होती. आता दोन्ही प्रकारचे शासन निर्णय जाहीर झाल्यामुळे म्हणजेच ३२ पेक्षा जास्त व ३२ पेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संस्थांची बिंदुनामावली सर्व संस्थांच्या नामावली तपासणीचे काम तत्काळ सुरू होणार आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक पदभरतीची प्रकि‘या मार्गी लागण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
एकीकडे जिल्ह्यातील हजारो Teacher recruitment शिक्षक रिक्त असून, दुसरीकडे मोठ्या संख्येने बेरोजगार युवक प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शासनाने यवतमाळ जिल्ह्यासाठी स्वतंत्र पदभरती मोहीम राबवावी, तसेच आदिवासीबहुल जिल्हे म्हणून घोषित असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विशेष भरती मोहीम घेण्यात यावी, अशी अपेक्षा जिल्ह्यातील संस्थांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात यवतमाळ जिल्हा खाजगी संस्था संचालक मंडळ सचिव अनिल गायकवाड सांगितले की, यवतमाळ जिल्ह्याचा बिंदुनामावलीचा तिढा सुटल्यामुळे आता शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने तत्काळ पावले उचलून स्वतंत्र पदभरती मोहीम सुरू करावी, हीच जिल्ह्यातील सर्व संस्थांची एकमुखी मागणी आहे.