मानोरा,
ST reservation protest आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये इतर समाजाचा समावेश करू नये, या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी निघालेल्या मोर्चामध्ये हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिवासी समाज बांधवांच्या विविध संघटनेचे पदाधिकार्यांनी निवेदन पाठविले.
यावेळी आरक्षण आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बाप्पाचा, बिरसा मुंडा जिंदाबादच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. निवेदनात नमूद केले आहे की, आदिवासी समाजाची भविष्यकालीन वाटचाल फारच दयनीय आहे. बंजारा व धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोर्चा मोर्चे आंदोलने करीत आहे. हा आदिवासी समाज बांधवावर अन्याय असून, याला आदिवासी समाज बांधवावर अन्याय आहे. त्यामुळे इतर समाजाला एसटी आरक्षणात सहभागी करण्यात येवू नये,असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
मोर्चात जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांना आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी पोलिस अधीक्षक जानकीराम डाखोरे, माजी नियोजन अधिकारी डॉ. महादेव डाखोरे, अभा विकास परिषदेचे अध्यक्ष राम चव्हाण, सुभाष पवणे, माजी गटशिक्षणाधिकारी गणपत आव्हळे, यांनी मोर्चाला संबोधित केले.प्रास्ताविक अक्षय मस्के यांनी केले. सूत्रसंचालन किसन डफडे यांनी तर आभार प्रदर्शन आनंद खुळे यांनी केले.