'राष्ट्रवादी' नेत्यांकडून एक महिन्याचा पगार मदतीसाठी

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
मुंबई
Ajit Pawar मराठवाड्यात सध्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण झाली असून, लोकांचे घरकुल, भांडीकुंडी वाहून गेल्याची घटना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील उभ्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे लाखो हेक्टर पिके नष्ट झाली असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आणि सविस्तर आर्थिक मदत देण्याची मागणी जोर धरली आहे.
 
 

Ajit Pawar 
 
 
राज्य सरकारने Ajit Pawar या संकटाचा गांभीर्याने विचार करत, शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारने नियम व अटी बाजूला ठेवून सगळ्या शेतकऱ्यांना सध्या सडळ हाताने मदत करण्याचा निर्णय घेतल्याचेही जाहीर केले आहे. तसेच केंद्र सरकारकडूनही यासाठी आर्थिक मदत मागितली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 


अशी करणार मदत
 
 
 
 
दरम्यान, या Ajit Pawar गंभीर पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी आणि विधानपरिषद सदस्यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दान करणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. तटकरे यांनी सांगितले की, “संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे आहे. या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.”याचबरोबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पुरग्रस्त भागांचा दौरा सुरू केला आहे. ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना भेट देऊन पूरस्थितीचे आढावा घेत आहेत. स्थानिक मंत्र्यांबरोबर पूरपरिस्थितीची पाहणी करत प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्यांच्या-त्यांच्या भागात मदतीचे काम करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
केंद्र सरकारकडे माहिती
 
 
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “लाखो हेक्टरमध्ये पीकाचे नुकसान झाले असून, त्याची माहिती केंद्र सरकारकडे पाठवली जाईल. केंद्राकडूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” आता केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचे स्वरूप आणि प्रमाण पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
राज्यातील या मुसळधार Ajit Pawar पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीवर मात करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच राजकीय नेते एकजुटीने पुढे आले आहेत. अशा प्रसंगी जनतेला मदत करण्याचा प्रयत्न अधिक वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.