कारंजा लाड,
Akash Karhe येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादितच्या अध्यक्षपदी आकाश कर्हे तर उपाध्यक्षपदी पांडूरंग भगत यांची सर्वानुमते अविरोध वर्णी लागली आहे. २३ सप्टेंबर रोजी स्थानिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात ही निवडणूक पार पडली.
येथील प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादितच्या ११ संचालकपदासाठी ७ सप्टेंबर रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत विकास पॅनलचे अॅड. रवी रामटेके, आकाश कर्हे, पांडुरंग भगत, आशिष बंड, गुलाब साटोटे, कृष्णराव राऊत, ओंकार पाढेन, प्रशांत काळे, मेघराज जुमडे, सुनीता उके व डॉ. अनघा उकर्डे यांनी मोठ्या मताधियाने विजय संपादन केला होता. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून पी.टी. सरकटे उपस्थित होते. दरम्यान, निवडीनंतर पतसंस्थेच्या इमारतीत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सूचक व अनुमोदकाची भूमिका बजावणारे संचालक आशिष बंड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची घोषणा केली. त्यानंतर सर्वांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संचालक तथा पतसंस्थेत कार्यरत कर्मचारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश कर्हे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले बँकेची प्रगती पहिले ज्याप्रमाणे होती तशीच प्रगती यापुढेही राहील कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणी काहीही गैरसमज पसरवीत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा, ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित आहेत आणि सुरक्षीत राहतील, असे