नागपूर,
विदर्भाच्या क्रिकेट संघाचे कर्णधार पद Akshay Wadkar अक्षय वाडकरकडे आले आहे. १६ सदस्यांच्या संघ नुकताच घोषित करण्यात आला. जामठा येथे १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान होणार्या इराणी क्रिकेट चषक स्पर्धेसाठी विदर्भ संघात अक्षय वाडकर व उपकर्णधार यश राठोडकडे देण्यात आले आहे, ही निवड वरिष्ठ निवड समितीचे सुधीर वानखेडे, पी.विवेक व जयेश डोणगावकर यांनी घोषित केली आहे.
संघ याप्रमाणे: Akshay Wadkar अक्षय वाडकर (कर्णधार), यश राठोड (उप-कर्णधार), अथर्व तायडे, अमन मोखाडे, दानिश मालेवार, हर्ष दुबे, पार्थ रेखडे, यश ठाकूर, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे, आदित्य अक्षय कर्णेवार, यश कदम, शिवम देशमुख (यष्टीरक्षक), प्रफुल्ल हिंगे, ध्रुव शोरी, मुख्य प्रशिक्षक- उसमान गनी, सहप्रशिक्षक -धरमेंदर अहलावत, फिजिओ तज्ज्ञ- डा. नितीन खुराणा, व्यवस्थापक: जितेंद्र दर्भे हे राहणार आहेत.