वर्धा,
Axis Bank loan fraud अॅसिस बँकेच्या वर्धा शाखेत उघडकीस आलेले कर्ज फसवणुकीचे प्रकरण केवळ वर्धेपुरते मर्यादित नसून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या फसवणुकीची नोंद झाली आहे. अमरावतीचे रहिवासी अनंत इंगळे आणि अनुप बनसोड हे या संपूर्ण प्रकरणाचे सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. नुकतेच वर्धा आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंगळे यांच्या अमरावती येथील घरावर धाड टाकून एक आलिशान कार, मोबाईल फोन, काही बनावट स्टॅम्प आणि कागदपत्रे जप्त केली आहे. पोलिस सध्या अनंत इंगळे आणि अनुप बनसोड यांचा शोध घेत आहेत.
पोलिस सूत्रानुसार, अनंत इंगळे हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे तर अनुप बनसोड बनावट स्टॅम्प, कागदपत्रे आणि बँक स्टेटमेंट तयार करण्यात तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते. कमलेश धोटे आणि रवींद्र गोमासे यांनी त्यांच्यासाठी एजंट म्हणून काम केले. पोलिस कोठडीनंतर रवींद्र आणि कमलेश यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात अनेक धकादायक खुलासे समोर आले आहे. या आधारे, एका पथकाने अलीकडेच अमरावती येथील अनंता इंगळे यांच्या घरी भेट दिली. परंतु, पोलिसांची चाहूल लागताच तो पसार झाला. पोलिसांनी घराची झडती घेत घरासमोर उभी असलेली एम. एच. ०१ डी. ई. ७५०० क्रमांकाची एक महागडी कार जप्त केली. या कारची किंमत सुमारे ४० लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. कारमधून अनेक बँकांचे बनावट स्टॅम्प, कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. यापूर्वी अनुप बनसोड यांच्या घरातून ३२ प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले होते. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांना चकमा देत आहेत. असे असले तरी त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने व्यत केला जात आहे.
मोबाईलमध्ये आढळले बँकेचे मॅसेज
अनंता इंगळे Axis Bank loan fraud यांच्या घरातून जप्त केलेल्या मोबाईल फोनच्या प्राथमिक तपासणीत अॅसिस बँकेचे काही मॅसेजेस पोलिसांना आढळले आहे. या फसवणुकीत काही बँक कर्मचार्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सविस्तर तपासात आणखी काही गबाड उघड होण्याची शयता आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जी. एस. मुदमाली आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करीत आहे.