बुलडाणा,
bccn buldhana urban बीसीसीएन बुलडाणा अर्बन गरबा फेस्टिवल २०२५ जिजामाता स्टेडियम च्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात उदघाटन झाले.भव्य स्टेज, रंगीबेरंगी एलईडी लाईटस्, डीजेच्या गगनभेदी बीटस्, पारंपरिक वेशभूषेत सजलेले शेकडो तरुण- तरुणी आणि डीजेच्या गजरात झालेल्या उदघाटन सोहळ्याने बुलडाण्याचा उत्सवप्रिय चेहरा उजळून निघाला.
या गरबा फेस्टिवलचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे मुख्य उदघाटक म्हणून बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर , कार्याध्यक्ष अॅड जितेंद्र कोठारी, अनंता देशपांडे,एपीआय लोखंडे साहेब, पिएसआय अश्विनी गाढे , बिसीसीएनचे सुधाकर अहिर, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी बद्रीनाथ घुगे,पत्रकार राजेंद्र काळे, राजेश डिडोळकर, आदींच्या शुभहस्ते दुर्गामातेच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आले.bccn buldhana urban या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लालाभाई माधवानी यांनी केले. या कार्यक्रमाचे परिक्षक , सुनयना अंभोरे, किर्ती माहेश्वरी, सुरेश गोरे, राजेश बगाडे,गजानन रिंढे यांनी केले.यावेळी गरबा दांडियाला शहरातील महिला तरुण, तरुणी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यकारिणीचे सर्व सदस्य, बुलडाणा अर्बनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.