राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र द्यावे तहसीलदारांकडे भाजपाचे निवेदन

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
बुलढाणा,
nationality certificate बुलढाणा तालुक्यातील निरक्षर व अशिक्षित जेष्ठ नागरिकांना राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळविण्यास येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्याबाबत भारतीय जनता पार्टी तर्फे तहसीलदारांना दि. २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९६० ते १९८० दरम्यान जन्मलेले अनेक जेष्ठ नागरिक विविध प्रशासकीय कामांसाठी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्राची मागणी करीत असतात. मात्र निरक्षर व अशिक्षित असल्यामुळे त्यांच्या जवळ शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्मदाखल्यामध्ये जन्मस्थळाची नोंद उपलब्ध नसल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यात गंभीर अडचणी येत आहेत.
 
 
 
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, इतर तालुक्यामध्ये अशा प्रकरणांमध्ये संबंधितांकडून प्रतिज्ञापत्र स्वीकारून प्रमाणपत्रे दिली जात आहेत. त्याच पद्धतीने बुलडाणा तालुयातील नागरिकांना देखील न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतांना भाजपा तालुका अध्यक्ष सतीश भाकरे पाटील, सुनील देशमुख, अ‍ॅड. मोहन पवार, डॉ. राजेश्वर उबरहंडे, चंद्रकांत बर्दे, मंदार बाहेकर, सतीश देहाडराय, प्रवीण गाडेकर, सारंगधर एकडे, शरद एकडे, दत्ता शेवाळे, अनिल आपार, संदीप उगले, विशाल सोनुने, सागर पाटील, सिद्धेश्वर लकडे, नाजुकराव सपकाळ उपस्थित होते.