कर्मचार्‍यांच्या संपामुळे सेवा पंधरवड्यावर संकट !

*लोक सहभागाला प्रतिसाद कोण देईल?

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
सिंदी (रेल्वे),
revenue servant strike जनता व प्रशासनामधील महत्त्वाचा दुवा असलेले महसूल सेवक संपावर गेल्यामुळे सेवा पंधरवड्यावर विपरित परिणाम होण्याची दाट शयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लोकांचा सहभाग असेल तरी त्यांची कैफियत ऐकणारे संपावर गेले. त्यामुळे या उपक्रमावर संकट येण्याची चिन्हं दिसून येत आहे.
 


महसूल विभाग  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑटोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यात सर्वांसाठी घरे, सुशासनयुत पंचायत तयार करणे, जलसमृद्धी, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, उपजिविका विकास आदी मुद्यांवर या उपक्रमात भर दिल्या जाणार आहे. या उपक्रमाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची भूमिका महसूल सेवक बजावत असतो. मात्र, चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा यासाठी महसूल सेवक १० दिवसांपासून संपावर आहेत. आता साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या सेवा पंधरवडा उपक्रमात आम्ही सहभागी नाही, याची जाणीव कर्मचार्‍यांनी करवून दिली आहे. शासनानेही आमची चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करून ‘सेवा पंधरवड्यात’ सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी भावना महसूल सेवक व्यत करीत आहे.
दुसरीकडे हा सेवा पंधरवडा उपक्रम राबविताना प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. शासनाने अद्यापही त्यांच्या संपाची दखल घेतली नाही. सद्या, अतिवृष्टीने बाधित पिकांचे पंचनामे करणे गरजेचे आहे. आंदोलन काळात ई-पीक नोंदणी प्रभावित झाली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखले इत्यादी मिळू शकत नाही.revenue servant strike शेतकर्‍यांची अनुदानासाठी कागदपत्रे गोळा करणे, अनुदानाच्या याद्या तयार करणे, शेतकर्‍यांना फेरफार वितरित करताना महसूल सेवकांची मोलाची मदत होते. पण, महसूल सेवक संपावर असल्यामुळे गावातील सामान्य माणसाला सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सेवा पंधरवडा राबविताना मोठी कसरत करावी लागत आहे. शासनाने महसूल सेवकांच्या संपावर तोडगा काढल्यास प्रशासनाच्या कामाला गती मिळेल आणि हा उपक्रम यशस्वी होईल, अन्यथा नाही असे तुर्तास जाणवते.