मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर राहणार कडेकोट बंदोबस्त

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेकडून नियोजन
 
नागपूर,
Dhamma Chakra Pravartan Day धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होणारी गर्दी लक्षात घेता मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानक, अजनी रेल्वे स्थानकावर येत्या २९ सप्टेंबर पासून कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वेकडून नियोजन केल्या जात आहे.मुख्य रेल्वेस्थानकावरील विकास कामे लक्षात घेता गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांकडून नियोजन केल्या जात आहे.
 
 
nagpur
 
मुख्यत: २ ऑक्टोबर रोजी दसरा Dhamma Chakra Pravartan Day  धम्मचक्र दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची दीक्षाभूमी तसेच कामठीच्या ड्रॅगन पॅलेसमध्ये दरवर्षी मोठी गर्दी होत असते. देशभरातील असंख्य अनुयायी मुख्यत्वे अजनी रेल्वे स्टेशन आणि मुख्य रेल्वे स्टेशन तसेच कामठी रेल्वे स्थानकावरून येणे-जाणे करीत असतात. हीच बाब लक्षात घेऊन संयुक्त बैठक घेण्यात आली आहे. रेल्वे पोलिस अधीक्षक जीआरपी, आरपीएफ व शहर पोलिस अधिकार्‍यांनी सुरक्षेच्या संबंधाने उपाययोजना करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
सोमवारपासून बंदोबस्त
मुख्य रेल्वे स्थानकांसह अजनी आणि कामठी येथे बंदोबस्त लावल्या जाणार असून जीआरपी तसेच आरपीएफच्या सोबतीला रेल्वे कर्मचारी तैनात राहणार आहेत. तिन्ही रेल्वे स्थानकावर बॉम्बशोधक आणि नाशक पथक देखील तैनात राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी आहे. रेल्वे स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलातील जवानांच्या सुट्टया रद्द करण्यात आले आहेत.