वर्धा,
driver fine amount बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. बहुदा दोषी वाहन चालक दंडाची रकम ‘ऑन द स्पॉट’ अदा करतात. पण काहींकडून दंडाची रकम अदा केली जात नाही. अशावेळी दंडास पात्र ठरलेल्या वाहनधारकांना न्यायालयाचा समन्स प्राप्त होतो. शिवाय प्रकरण न्यायालयाची पायरी चढते. ६० हजार ८५४ वाहनधारकांकडे तब्बल ४.२४ कोटी दंडाची रकम थकित असल्याने वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने थकित दंड वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.
नो-पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, वाहतूक नियमांची पायमल्ली करणार्यांवर वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. शहरी व ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा सपाटा लावल्या जात आहे. ६० हजार ८५४ वाहनधारकांवर दंड ठोठावल्यावर आणि त्यांनी दंडाची ४ कोटी २४ लाख २२ हजार ३०० इतकी रकम अजूनही अदा न केल्याने थकित दंड वसुली मोहीम वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दोन महिन्यात ११ हजार ३२४ वाहनधारकांकडून थकीत दंडाची रकम वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वसूल करण्यात आली आहे. थकीत दंडाच्या रकमेचा आकडा आणखी कसा कमी करता येईल यासाठीही विशेष मोहिमेतून प्रयत्न केले जात आहे. वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने थकीत दंड वसुली मोहीम राबविली जात आहे.driver fine amount जुलै महिन्यात ६८५ वाहनधारकांकडून थकीत दंडापोटी ३ लाख १० हजार ९०० रुपये वसुल करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात १० हजार ६३९ वाहनधारकांकडून ३ लाख ६० हजार ९५० रुपयांचा थकीत दंड वसूल करण्यात आला आहे.