नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकर्‍यांसाठी १२१ कोटींच्या मदत निधीस मंजूरी

    दिनांक :24-Sep-2025
Total Views |
बुलढाणा,
makarand jadhav patil जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या १ लाख ८० हजार ३६८ शेतकर्‍यांना शेतपिकांच्या नुकसानीपोटी १२१ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय २३ सप्टेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपोटी जिल्ह्यातील बाधितांना २१९ कोटी ७० लाख ८२ हजार रुपये इतका मदत निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.
 
 

जाधव  
 
 
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकर्‍यांप्रती शासन संवेदनशील असून अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकर्‍यांना मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मदत निधीला मान्यता दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती याप्रमाणे.यापुर्वी २२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अवेळी पाऊसामुळे बाधित १४ हजार ९०९ शेतकर्‍यांना १५ कोटी ५५ लाख ५० हजार रुपये इतका मदत निधीस मान्यता दिली आहे. तसेच ६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ९० हजार ३८३ शेतकर्‍यांना ७४ कोटी ४५ लाख ३ हजार रुपये इतका निधी तर १७ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित ८ हजार ३९७ शेतकर्‍यांना ७ कोटी ८० लाख ८६ हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.makarand jadhav patil तसेच आज दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीतील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरामुळे बाधित १ लाख ८० हजार ३६८ शेतकर्‍यांना १२१ कोटी ८९ लाख ४३ हजार रुपये निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.